Share

इंधन दरवाढीवर स्पष्टीकरण देताना पेट्रोलियम मंत्र्यांनी तेल कंपन्यांवर फोडलं खापर

Published On: 

कोची: सध्या दररोज इंधन दरवाढ होत आहे. इंधनाचे दर लवकरच शंभरी गाठतील यात शंका नाही. सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम आहे. पेट्रोलच्या दरात 28 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीसह मुंबईत पेट्रोलचे दर 95.19 रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर 86.02 रुपयांवर पोहेचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या वाढत्या किमतीमुळे इंधन दरवाढ होताना दिसत आहे. मात्र कच्च्या तेलाची किंमत पुन्हा कमी होऊ शकते, ज्यामुळे इंधनांच्या किंमतीतही घसरण होण्याची शक्यता वर्तवला जात आहे. मात्र सध्याच्या स्थितीत पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे नागरिकांचा खिसा रिकामा होताना दिसतोय. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने इतर जीवनावश्यव वस्तूच्या किमतीतही वाढ होताना दिसते.

दरम्यान, इंधन दरवाढीवरून विरोधाकांकडून सरकारवर टीका होत आहे या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी शनिवारी तेल उत्पादक देशांनी कृत्रिम स्वरुपात किंमती वाढवल्यामुळे इंधनवाढ होत असल्याचे म्हटले आहे. रविवारी केरळमधील कोची याठिकाणी बीपीसीएल कोची रिफायनरीमध्ये पेट्रोकेमिकल पार्कच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रधान यांनी यावेळी अशी प्रतिक्रिया दिली की कच्चे तेल महाग झाल्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

यावेळी बोलताना प्रधान पुढे म्हणाले की, ‘मला हे बोलताना खेद वाटतो आहे की तेल उत्पादक देश उपभोक्ता देशांच्या हिताचा विचार करत नाही आहेत. त्यांनी आर्टिफिशिअल प्राइस मॅकेनिझम निर्माण केले आहे. त्यामुळे उपभोक्ता देशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.’ दरम्यान पेट्रोलियम मंत्र्यांनी हे देखील म्हटले आहे की, तेल उत्पादक देश उत्पादन वाढवण्यासंदर्भात काही सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!