Share

‘स्टंटबाजी करून विकासाची खोटी स्वप्ने दाखवतात’; शिवेंद्रराजे भोसले यांचा उदयनराजेंवर निशाणा

Published On: 

सातारा: नगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosle) यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले सध्या कोट्यवधींच्या विकासकामांची खोटी स्वप्ने दाखवत आहेत मात्र हा देखील विकास नुसता कागदावरच पाहायला मिळणार आहे. सातारा नगरपालिका ही भ्रष्टाचाराचे कुरण झालेली आहे, तिथं नुसत चरायच आणि आपले खिसे भरायचे एवढच झाले असल्याचा घणाघात आमदार शिवेंद्रराजेंनी खासदार उदयनराजेंवर केला आहे.

पुढे बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, निवडणूक जवळ आल्या की खासदार उदयनराजेंना इनोव्हेटिव्ह साताराचे स्वप्न पडते. वातावरण निर्मितीसाठी खासदार उदयनराजे भोसले नेहमीच स्टंटबाजी करून सातारकरांना विकासाची खोटी स्वप्न दाखवतात. त्यामुळे सातारकरांना त्यांच्या खोटेपणाची जाणीव झाल्याने त्यांना सातारा विकास आघाडीचा पराभव दिसू लागला आहे, असंही शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!