Share

पुणे भाजपमध्ये मोठी बंडाळी ? अजित पवार म्हणतात…

Published On: 

पुणे : महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे १९ नगरसेवक गडबड करण्याच्या चर्चेमुळे पक्षात खळबळ उडाली आहे. हे नगरसेवक येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीत सामील होण्याच्या शक्यतेने त्यांच्या राजकीय हालचालींवर वरिष्ठांकडून विशेष नजर ठेवण्यात येत आहे. महापालिकेत भाजपकडे ९९ नगरसेवकांचे संख्याबळ असून, सर्वांनाच पदे शक्य नसल्याने नाराजांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत बंडखोरी रोखण्यासाठी नेत्यांनी बंदोबस्त सुरू केला आहे.

गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेत मोठं यश मिळवलं होतं. मागील निवडणुकीत तब्बल ९९ नगरसेवक निवडून आणत भाजपाने एकहाती सत्ता मिळवली, या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेतून अनेक नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र आता यातील काही नगरसेवक भाजपा सोडण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे पुण्याचे १९ नगरसेवक नाराज प्रकरणी मला अधिक माहिती नाही, मी उद्या पुण्याला जातोय, उद्या मिटिंग लावल्या आहेत ही ऐकीव माहिती, काही मिळालं नाही की अशा प्रकारच्या बातम्या परसल्या जातात. अस अजित पवार म्हणाले आहेत.

तर दुसरीकडे भारतीय जनता पक्ष ज्या ९९ नगरसेवकांच्या बळावर महापालिकेत सत्तेत आहे. त्यापैकी ६० नगरसेवक राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून ऐनवेळी भाजपात गेलेले आहेत. या ६० पैकी अनेकजण संपर्कात असून काहीजण पालकमंत्री अजित पवार यांना थेट भेटत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी केला आहे. आकड्यांत बोलण्यापेक्षा या सरकारच्या विरोधातील कल नगरसेवकांच्या लक्षात आला असून त्यामुळेच अनेक विद्यमान नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!