Share

“अशोक गर्ग MAGPIE ग्रुपने संजय राऊत कुटुंबाला भागीदारी दिली?”, किरीट सोमय्य्यांचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: सध्या शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाईनसंबंधी वाद चांगलाच रंगताना दिसत आहे. संजय राऊत यांनी वाईन व्यवसायात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांची एका बड्या उद्योजकाशी पार्टनरशीप आहे, असा आरोप किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांनी केला आहे. आता आज त्यांनी पुन्हा एक ट्वीट करत संजय राऊतांना सवाल केला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एक ट्वीट केले आहे, ज्यात त्यांनी म्हटले आहे की, “अशोक गर्ग MAGPIE ग्रुपने २०२१ मध्ये संजय राऊत कुटुंबाला भागीदारी दिली?(Raut Family Agreement with Magpie Global Limited Company) राऊत कुटुंबाला वाईन व्यवसायाचा अनुभव, ज्ञान, शिक्षण किंवा असा कोणताही व्यवसाय नाही? किंवा या संयुक्त उपक्रमासाठी एक पैसे योगदान दिले नाही?” असा सवाल करत संजय राऊत जवाब दो असे   किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान किरीट सोमय्या यांनी ‘मॅगपी ग्लोबल लिमिटेड या अशोक गर्ग यांच्या कंपनीसोबत राऊत यांची पार्टनरशीप आहे. त्यांचा हॉटेल, पब, क्लब आणि काही ठिकाणी वाईन वितरित करण्याचा व्यवसाय आहे. १६ एप्रिल २०२१ रोजी राऊत कुटुंबियांनी मॅगपीसोबत करारावर सह्या केल्या. विधिता आणि पूर्वशी या संजय राऊत यांच्या दोन्ही मुली या कंपनीत संचालक आहेत.’ असा आरोपही केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!