🕒 1 min read
मुंबई : अक्षयचा कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देत असूनही पहिल्याच दिवशी चित्रपटाने १३. ५० कोटी रुपयांची कमाई केली. तर अक्षय सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या अक्षय समोरच्या व्यक्तीला मराठीतच बोलण्याचा आग्रह करताना दिसतो.
एका अमराठी व्यक्तीकडून #मराठी माणसाला मराठी आहात तर मराठी बोला सांगणे म्हणजे लज्जास्पद आहे…
आपण मराठी म्हणून चुकतोय ना?
का आपण मराठीवर ठाम राहत नाही?मराठी बोला, मराठी वाढवा…#सुधरारे#महाराष्ट्रातमराठीच #एकभाषिकराज्य#Marathi #म #महाराष्ट्र #Maharashtra@ekikaranmarathi pic.twitter.com/agCvcGtFOn
— आनंदा मारूती पाटील (Ananda Patil) (@ANANDAPATIL76) March 18, 2022
अक्षयचा हा व्हिडीओ एका नेटकऱ्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत अक्षय गाडीत बसलेला दिसत आहे. यावेळी तो फोनवर एका महिलेशी बोलताना दिसतो. आपल्या आवडत्या कलाकाराशी थेट बोलता येत असल्याचा आनंद त्या महिलेच्या प्रत्येक वाक्यातून जाणवतं. सुरुवातीपासून महिला हिंदीमध्येच बोलत होती. यातच अक्षयला जेव्हा कळलं की ती महिला सोलापूरची आहे. तेव्हा त्याने स्वतःहून मराठीत बोलायला सुरुवात केली. “आपण मराठी आहात तर आपण मराठीतच बोलूया ना..” अशी विनंतीही तो त्या चाहतीला करताना दिसतो.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
