अमरावती : लॉकडाऊन लावणार असाल तर आधी गरिबांचा विचार करा, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. लॉकडाऊनच्या मुद्यावर त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीय. कोरोनाला आळा घालण्यात ठाकरे सरकार पहिल्यापासूनच अपयशी ठरले आहे. त्यात आरोग्य सुविधाही मिळत नाही. अशा परिस्थितीत लॉकडाऊन लागले तर सामान्य लोकांचा आधी विचार करायला हवा, असेही खासदार राणा म्हणाल्या.
राज्यात कोरोना रुग्ण संख्या पाहता कडक लॉकडॉऊन लावण्याचा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहे. तशा बैठका देखील सुरू आहेत. राज्यातील अनेक मंत्र्यांनीच लॉकडाऊन लावण्याची मागणी केली आहे. या निर्णयावर खासदार राणा यांनी टीका केली. मुंबई आणि महाराष्ट्रातील बिल्डरांना पाच हजार कोटी रुपयांची मदत उद्धव ठाकरे सरकारने केली आहे. त्याच धर्तीवर हातावर काम करणारे कामगार आणि शेतकरी यांनाही मदत करायला हवी होती. कोरोना काळातील विज बील माफ करावे, अशी मागणी देखील खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.
सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी तसेच विज बील माफीचा निर्णय घेण्यात यावा. अशी मागणीही खासदारांनी केली आहे. या निर्णयासह लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास आम्ही त्याचे स्वागतच करु, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कोरोना परिस्थितीबाबतही त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली.
महत्त्वाच्या बातम्या
- लॉकडाउनबाबतचा निर्णय मुख्यमंत्री आजच घेणार, मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिले संकेत
- आजच्या सामन्यात मुंबईचे पारडे जड; ‘हे’ आहे कारण
- सोनाली कुलकर्णीने दिल्या गुढीपाडव्याच्या खास शुभेच्छा !
- मोदी हे ७० वर्षात देशाला लाभलेले अत्यंत बेजबाबदार व बेफिकीर पंतप्रधान – नाना पटोले
- 72 टक्के जपानी जनतेचा टोकियो ऑलिम्पिकला विरोध – क्युडो न्यूज सर्व्हे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

