Share

‘निर्दोष सिद्ध झालात तर स्वत:ची मिरवणूक हत्तीवरून काढा’, सदाभाऊंचा मुश्रीफांना टोला

Published On: 

कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी २७०० पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत. मुश्रीफ कुटुंबाने १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेले आरोप पूर्पपणे चुकीचे असून मी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही, असे स्पष्टीकर मुश्रीफ यांनी दिले होते. तसेच येत्या दोन आठवड्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयात मी १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे.

या सर्व प्रकरणांवर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी भाष्य करत मुश्रीफ यांच्यावर टीका केली आहे. ‘मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांनी केलेले आरोप हिमतीने स्वीकारले पाहिजेत. कर नाही त्याला डर कशाला म्हणून येणाऱ्या चौकशीला सामोरे गेले पाहिजे, असे आव्हान खोत यांनी दिले. प्रत्येकाची हत्तीवरून मिरवणूक काढतो म्हणणारे निर्दोष झाले, तर त्यांनी स्वत:ची मिरवणूक हत्तीवरून काढावी, असा टोलाही त्यांनी लगावला. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

‘आरोप झाल्यानंतर शांतपणे त्याला सामोरे गेले पाहिजे. प्रकरणात दोषी नसेल तर भीतीचे कारण काय? ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनी घाबरण्याची गरज नाही. मुश्रीफ मोठे नेते आहेत. त्यांचा आकडाही मोठा असतो. ते प्रत्येकावर मोठ्या आकड्याचाच दावा दाखल करतो म्हणतात’ अशी खोचक टीका खोत यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!