🕒 1 min read
सिंधुदुर्ग:- दिवाळीनंतर देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसत आहे. दिल्लीतही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणित वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
विरोधी पक्ष भाजपने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2 दिवसात अधिवेशन संपवल्याने ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. यावर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिलंय. महाराष्ट्रात आम्ही 2 दिवस अधिवेशन घेऊनही आम्हाला पळपुटे म्हणता, मग अधिवेशनच न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणाल? असा सवाल उदय सामंत यांनी केलाय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काय रणनीती असेल हे सांगणार नाही. मात्र, तिन्ही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत एकत्र लढण्याचा निर्णय झाला आहे, असंही सामंत यांनी नमूद केलं आहे.
दरम्यान, संसदीय संघटनेच्या म्हणण्यानुसार, कोव्हिड साथीच्या काळात जगातील 105 हून अधिक देशांवर ऑनलाईन, शारीरिक अंतर ठेवून आणि इतर नियमांना अधीन राहून अधिवेशन झाली आहेत. भारतीय संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करून मोदी सरकार आपल्या जबाबदा-यांपासून का पळत आहे ? असा सवाल काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- यासाठी मी आमदार निलेश लंकेंचा प्रचारक म्हणून काम करणार- अण्णा हजारे
- पंतप्रधान मोदींनी कडेकोट बंदोबस्ताशिवाय गुरुद्वारामध्ये दिली अचानक भेट
- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन
- दुखापतग्रस्थ मोहम्मद शमीच्या जागी लागणार ‘या’ युवा खेळाडूची वर्णी
- शिवसेनेला धक्का देत ‘हा’ माजी आमदार करणार आज भाजपमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
