Share

पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही तर पालिकेवर काढणार हंडा मोर्चा; संतप्त महिलांचा इशारा!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : जयभीम नगर वसाहतीत कमी दाबाने आणि अतिशय कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि महिलांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात घेरुन प्रश्नांची सरबत्ती केली. पाणीपुरवठ्यात सुधारणा झाली नाही तर पालिकेत हंडामोर्चा काढला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मागील काही दिवसांपासून जयभीमनगर परिसरातील काही भागांत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे. संबंधित भागातील पाणीपुरवठा कर्मचार्‍यांकडे तक्रार करूनही त्यात सुधारणा झाली नाही. जयभीमनगरात कमी वेळ पाणीपुरवठा केला जात असल्याची नारिकांची तक्रार आहे. तसेच काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सुरळीत पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी येथील महिलांसह नागरिकांनी सोमवारी थेट पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांच्या दालनात धडक दिली.

आमच्या भागात किमान दीड तास पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर धांडे यांनी सर्वच भागात ४५ मिनिटेच पाणीपुरवठा केला जात आहे. तेव्हा तुमच्या भागात थेट दीड तास पाणीपुरवठा कसा करता येईल. पाणीपुरवठा विस्कळीत असेल तर त्यात सुधारणा केली जाईल, अशा शब्दांत नागरिकांना समजावले. मात्र महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्यांनी आमचा पाणीप्रश्‍न सुटला नाहीतर पालिकेवर हंडामोर्चा काढला जाईल, असा इशारा देत धांडे यांचे दालन सोडले. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार या भागातील नागरिक पाणीपट्टीच भरत नाहीत. नागरिकांना पाणीपट्टी भरल्याच्या पावत्या विचारल्या असता एकाकडेही पाणीपट्टी भरल्याची पावती नव्हती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!