🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या शिवसंदेश दौरावर आहेत. यादरम्यान ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना वारंवार गद्दार म्हणून अवहेलना करत आहेत. त्यामुळे आता शिंदे गटातील आमदार अस्वस्थ होऊन आक्रमक झाले आहेत. अशातच शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी थेट आदित्य ठाकरेंवर टीकास्त्रेचा बाण सोडला.
दीपक केसरकर यांचे आदित्य ठाकरेंना सवालः
आदित्य ठाकरेंवर प्रश्नांचा पाऊस करत, मुख्यमंत्री पद आणि मंत्री पद घरातच ठेवलं ही शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी गद्दारी नव्हती का? शिवसेना प्रमुखांना तरी हे पटलं असतं का? छत्रपतींच्या घराण्याला तुम्ही वाकवण्याचा प्रयत्न केला, उमेदवार उमेदवारीसाठी तुम्ही तानाजी छत्रपतींकडे करार पत्र मागित, ही गद्दारी नव्हती का? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना दाराआड दिलेला शब्द मोडणं याला काय म्हणतात? असा सवाल करतानाच गद्दारी शब्द आम्हाला वापरता तो तुम्हाला का वापरू नये?, असा सवाल दीपक केसरकर यांनी केला आहे.
ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, ते शिव संपर्क मोहीम राबवत आहेत. छत्रपतींच्या नावाचा आधार केला जातो, पण इथे त्यांच्याकडूनच करारनामा मागितला गेला, असं देखील केसरकर यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंवर घणाघातः
आदित्य ठाकरेंवर घणाघात करत असताना राज्याच्या भूमीशी असं करणार असाल तर तुम्ही जे शब्द वापरता तो कोणाबद्दल वापरायला पाहिजे याचा विचार केला पाहिजे, आम्ही छत्रपतींच्या गादीशी नतमस्तक होतो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अख्ख महाराष्ट्र जागृत केलं. तुम्ही लोकशाहीचा अपमान करता, जनतेचा तुम्ही अपमान करत आहात, अशी टीकाही केसरकर यांनी केली आहे.
दरम्यान, राज्यात यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं, एकाच घरात मुख्यमंत्री आणि मंत्री होते, शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं, मात्र, इथे तुम्ही घरातच मंत्रीपद दिली. हे बाळासाहेबांना तरी पटलं असतं का? असा सवाल करत बाळासाहेबांच्या विचारांशी ही गद्दारी नाही का?, असा सवाल केसरकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Urfi Javed| हेटर्सनी फेकलेल्या दगडांपासून उर्फी जावेद हिने बनवला ड्रेस, पाहा व्हिडीओ
- Rohit Pawar । “दांडा हातात घेऊन विटीसारखं कोलण्याची क्षमताही…”; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल
- Mumbai| ‘मुबारक हो मुंबई मे हमला होने वाला है’, मुंबई पोलीस यांना तब्बल 26 मेसेज
- Shivsena | खरे मोदी कोणते? भ्रष्टाचार सहन करणार नाही म्हणणारे, की भावनाताईंकडून राखी बांधून घेणारे; शिवसेनेचा सवाल
- Uddhav Thackrey| “…मोदी पर्व संपण्याची ही कबुली आहे”, उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
