Share

‘ज्यांनी हिंदुत्व व मराठी अस्मितेला विरोध केला त्यांनी जर..’, दरेकरांचा सेनेला टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी भाजप उमेदवाराचा दणदणीत पराभव केला. दादरा नगर हवेलीच्या विजयासह शिवसेनेने प्रथमच महाराष्ट्राबाहेर लोकसभा जागा जिंकली आहे. सेनेच्या या कामगिरीनंतर आता भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शुभेच्छा देत टोलाही लगावला आहे.

शिवसेनेच्या कामगिरीसाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्हाला दु:ख वाटण्याचं कारण नाही, आम्हाला आनंदच आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेने मराठी अस्मिता, हिंदुत्व हे सगळं गुंडाळून ठेवलं. ज्यांनी आयुष्यभर हिंदुत्वाला विरोध केला, मराठी अस्मितेला विरोध केला, स्वाभिमानाला विरोध केला त्यांच्याशीच सेनेने हातमिळवणी केली. दादरा नगर हवेलीची जागा जिंकल्याने सेना जर राष्ट्रीय राजकारणात जाणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत. असे खोचक ट्वीट करत दरेकर यांनी व्हिडिओ पोस्ट केला आहे.

दरम्यान दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील मरीन ड्राईव्ह लगतच्या एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर 30 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडलं तर काल मतमोजणी झाली. या निवडणुकीत सेनेच्या कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावीत यांचा 51 हजार मतांनी पराभव केला आहे. तर शिवसेनेच्या विजयानंतर नेतेमंडळी सेना पक्षनेतृत्वाचं आणि खासदार संजय राऊत यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा देत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!