औरंगाबाद : जवळ असलेल्या आदर्श गाव पाटोदाच्या सरपंचांनी अख्ख्या गावाची दिवाळी गोड केली आहे. गावकऱ्यांनी कोविडच्या संकटांतही शंभर टक्के टॅक्स भरल्याने गावातील प्रत्येक कुटुंबियांना बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर 20 रुपयांनी दिली आहे. तीही प्रत्येक कुटुंबाला 25 किलो.
आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या पाटोदा गावचा आणखी एक नवा गोड आदर्श यानिमित्ताने समोर आला आहे. गावचे सरपंच भास्कर पेरे यांनी गावकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचे ठरवलं होतं. त्यामुळे संकटांतही शंभर टक्के टॅक्स भरल्याने गावातील प्रत्येक कुटुंबियांना बाजारात 35 रुपये किलोने मिळणारी साखर 20 रुपयांनी दिली आहे.
औरंगाबाद शहरापासून वीस एक किलोमीटरवर असलेल्या पाटोदा गावात ग्रामपंचायत कराचा शंभर टक्के भरणा होतो. ग्रामपंचायत कराची रक्कम फक्त धनादेशाद्वारेच स्वीकारली जाते, म्हणजेच गावात घरटी किमान एक बँक खाते आहे. तीन हजार 350 लोकसंख्या असलेल्या गावानं राज्यात आदर्श गाजवून दिले आहेत.
दरम्यान महाराष्ट्राचे मुखमंत्री उद्धव ठकरे यांनी जनतेशी संवाद साधला त्यावेळी म्हणाले, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाने करावा,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कलादालनाच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना संधी उपलब्ध करुन देण्यात येत असून ही बाब विशेष कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शहरामध्ये सुरु असलेल्या विकासासाठी त्यांनी समाधान व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व शहरवासियांना प्रकाशपर्व दीपावलीच्या आरोग्यमय शुभेच्छा दिल्या.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मंत्री धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल
- तेजस्वीच्या सभेसारखी गर्दी आपल्याकडे राज ठाकरेंच्या सभेला होती पण सत्ता येत नाही – तावडे
- अमेरिकेच्या निवडणुकीत आलेला लोकशाहीचा कौल डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारावा; आठवलेंचा सल्ला
- ‘बायडन यांच्या विजयामुळे सुखावलेले आज पुन्हा कोमात’…
- नाटक सुरु करावीत; नाटकक्षेत्राने गाठला राज ठाकरेंचा दरबार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
