मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले होते. यानंतर जूनपासून टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात आले असून सद्या नोव्हेंबर अखेरपर्यंत अनलॉक-५ ची नियमावली लागू करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने नाट्यगृहे आणि चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी दिली.
नाट्यगृहं, सिनेमागृहं, मल्टिप्लेक्सेस ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यासह खास नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. मराठी भाषेला लाभलेला अमूल्य वारसा म्हणजे नाटक रंगभूमी. मराठीचा वारसा टिकवण्यात, मनोरंजन व वैचारिक चालना देण्यासाठी नाटकक्षेत्र देखील मोलाचा वाटा उचलत असतो. मात्र, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या नाट्यक्षेत्राला लॉकडाऊनने फार मोठा फटका बसला आहे.
त्यामुळे, नाट्यगृह जरी खुली करण्यात आली असली तरी आर्थिक व इतर उद्भवणाऱ्या प्रश्नांवरून नाटक क्षेत्रातील कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली आहे. यावेळी, नाटक सुरु करण्यासंदर्भात येणा-या अडचणी त्यांनी राज ठाकरेंसमोर मांडल्या आहेत. राज ठाकरेंचं कलाप्रेमी व रसिकमन वेळोवेळी राज्याने पहिले आहे, त्यामुळेच ते नाट्यक्षेत्राला देखील सावरण्यात महत्वाची भूमिका बजावतील या आशेने या कलाकारांनी राजदरबार गाठला आहे.
यापूर्वी खाजगी कोचिंग क्लासेस चालक-मालक, फी-वाढ व ११ वी प्रवेशप्रक्रियांसंदर्भात विद्यार्थी-पालक, डॉक्टर, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. अनेक अडचणी राज ठाकरेंच्या भेटीनंतर दूर होत असल्याने न्याय कृष्णकुंजवर मिळतो अशी भावना देखील मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती.
महत्वाच्या बातम्या
- अर्णबला तगडा झटका; रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत आणखी वाढ !
- ‘नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याची भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे’
- बिहारची निवडणुक लढविणाऱ्या सेनेच्या वाघांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता
- ‘बायडन यांच्या विजयामुळे सुखावलेले आज पुन्हा कोमात’…
- अर्णबला तगडा झटका; रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत आणखी वाढ !


