Share

अमेरिकेच्या निवडणुकीत आलेला लोकशाहीचा कौल डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारावा; आठवलेंचा सल्ला

Published On: 

मुंबई : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी व्हायला पाहीजे होते मात्र या अटीतटीच्या निवडणुकीत जो बायडेन विजयी झाले. त्यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे स्वागत. लोकशाहीचा कौल मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारला पाहिजे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

अमेरिकेची पहिली महिला उपाध्यक्ष म्हणून ऐतिहासिक विजय मिळवलेल्या कमला हॅरिस यांचेही रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वात अमेरिका आणि भारत दोन्ही राष्ट्रांचे सबंध अधिक दृढ होतील. अमेरिकेच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

अमेरिकेत स्थायिक भारतीयांना न्याय देण्याचे काम अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस करतील असा विश्वास ना रामदास आठवले यांनी व्यक्त केला. . तर, देशातील इतर नेत्यांनी देखील जो बायडेन यांच्या विजयाचे स्वागत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांचं अभिनंदन व्यक्त करत येणाऱ्या काळात भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ होतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!