पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार भाजप-जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा करिष्मा चालणार असून महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलद्वारे केला होता. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांमधील चित्र जवळपास तसेच होते. मात्र १० वाजेनंतर आता दुपारी ३.०० वाजेपर्यंत एनडीए अर्थात नितीश कुमार यांनी आघाडी कायम ठेवली आहे.
नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असलेल्या एनडीएने देखील दमदार मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. आताच हाती आलेल्या कलांनुसार एनडीए सध्या १२५ जागी आघाडीवर आहे. यात भाजपा ७० जागा, जदयू ४८, व्हीआयपी ६, तर हम एका जागेवर आघाडीवर आहे. महाआघाडीने सध्या १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. यात राजद ६२, काँग्रेस २० तर डावे १९ जागांवर आघाडीवर आहे.
आता या कालांवरून भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे स्पष्ट बहुमत बिहार मध्ये येताना दिसत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी जल्लोषाला सुरवात केली आहे. यावर मात्र भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी तेजस्वी यादव यांच्या लढावू बाण्याचे कौतुक केले आहे. तेजस्वी यादव यांच्या सभेला जी गर्दी होती तशी आपल्याकडे राज ठाकरेंच्या सभेला होती. पण गर्दीचे रुपांतर मतात होत नाही. एक मात्र नक्की लालू प्रसाद यादव यांच्यासारखा मातब्बर नेता नसताना तेजस्वी यादव ज्याप्रमाणे लढले त्याच कौतुक व्हायला हवं. अस तावडे म्हणाले आहेत. तर तेजस्वी यांचा १० लाख नोकऱ्या देण्याचा मुद्दा लोकांनी उचलला पण त्या नोकऱ्या कशा देणार हे जर तेजस्वी यांनी सांगितल असत तर नक्कीच फरक पडला असता अस देखील तावडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘बायडन यांच्या विजयामुळे सुखावलेले आज पुन्हा कोमात’…
- बहुप्रतीक्षित ‘लक्ष्मी’ चित्रपट प्रदर्शनानंतर ठरला फ्लॉप
- अर्णबला तगडा झटका; रिपब्लिक टीव्हीच्या अडचणीत आणखी वाढ !
- ‘नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याची भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे’
- बिहारची निवडणुक लढविणाऱ्या सेनेच्या वाघांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता


