Share

‘बायडन यांच्या विजयामुळे सुखावलेले आज पुन्हा कोमात’…

Published On: 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. 243 जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदार पार पडल्यानंतर आज मतमोजणी होणार आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह 3733 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. कोरोना काळातील ही सर्वात मोठी निवडणूक आहे. राज्यात मतमोजणीसाठी 38 जिल्ह्यांमध्ये 55 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.

नितीश कुमार पुन्हा सत्तेत येणार की तेजस्वी यादव विजय मिळवणार हे आज स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांनुसार भाजप-जेडीयू यांच्या युतीने आघाडी घेतली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत तेजस्वी यादव यांचा करिष्मा चालणार असून महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल असा दावा सर्वच माध्यमांनी एक्झिट पोलद्वारे केला होता. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन तासांमधील चित्र जवळपास तसेच होते. मात्र १० वाजेनंतर आता दुपारी ३.०० वाजेपर्यंत एनडीए अर्थात नितीश कुमार यांनी आघाडी कायम ठेवली आहे.

नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असलेल्या एनडीएने देखील दमदार मुसंडी मारायला सुरुवात केली आहे. आताच हाती आलेल्या कलांनुसार एनडीए सध्या १२५ जागी आघाडीवर आहे. यात भाजपा ७० जागा, जदयू ४८, व्हीआयपी ६, तर हम एका जागेवर आघाडीवर आहे. महाआघाडीने सध्या १०१ जागांवर आघाडी घेतली आहे. यात राजद ६२, काँग्रेस २० तर डावे १९ जागांवर आघाडीवर आहे.

मात्र या कालांवरून आता भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे स्पष्ट बहुमत बिहार मध्ये येताना दिसत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी जल्लोषाला सुरवात केली आहे. भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी याचा सबंध थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीशी जोडत विरोधकांवर शरसंधान साधलं आहे. बायडन यांच्या विजयामुळे सुखावलेले आज पुन्हा ‘कोमा’त… अस ट्विट करत भातखळकर यांनी विरोधकांची फिरकी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!