Share

वाहतूक तर बंद मग लसीकरणाला जायचे कसे? ग्रामीण भागातील तरुणांसमोर प्रश्न

Published On: 

जालना: १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना लस देणे सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच ग्रामीण भागातील तरुणांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचे दिसत आहे. भोकरदन तालुक्यातील तरुण संबंधित गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस टोचण्यासाठी गर्दी करीत आहेत, मात्र त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले आरोग्य कर्मचारी थेट भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात लस टोचण्यासाठी जाण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे येथील तरूणांची गैरसोय होत आहे.

एकीकडे लॉकडाऊनमुळे सर्वत्र वाहतूक व्यवस्था बंद आहे, अशा परिस्थितीत भोकरदनला जायचे कसे हा प्रश्न देखील तरुणांसमोर पडला आहे. त्यामुळे प्रशासनाने ज्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातच लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तरुणांनी केली आहे. भोकरदन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ वर्षावरील १ हजार ५०० तरुणांना लस देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, आठही प्राथमिक आरोग्य केंद्रांत तसेच ३९ उपकेंद्रांतील लसींचा साठा वेळोवेळी संपत असल्याने लस घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. शिवाय सध्या कडाक्याचे ऊन तापत असल्याने साध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील लसीकरण केंद्रात करण्यात आली नसल्याने पाण्यासाठी नागरिकांची वणवण होत आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र वाहतूक व्यवस्था ठप्प आहे, त्यातच सर्वच व्यवहार व उद्योगधंदे बंद असल्याने सर्वांचीच आर्थिक उलाढाल ठप्प झाली अाहे. अशा परिस्थितीत भोकरदनला जाणे परवडणारे नसल्याने अनेक तरुणांनी लस न घेण्याचा निर्णय घेतला आहे, शिवाय भोकरदन येथील ग्रामीण रुग्णालयात जायचे म्हटल्यावर किमान ३० किलोमीटर अंतर पार करून भोकरदन गाठावे लागणार आहे. त्यामुळे मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे. या निर्णयात आरोग्य विभागाने बदल करून स्थानिक रुग्णालयातच लस उपलब्ध करुन देण्याची मागणी तरुणांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!