Share

सलग एकापाठोपाठ चार खेळाडूंना कोरोनाची लागण ; BCCI नं दिली पहिली प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : भारतात सुरु असलेली आयपीएल स्पर्धा ही कोरोनाच्या संसर्गामुळे अर्ध्यातच स्थगित करण्यात आली होती. स्पर्धा स्थगित होण्याअगोदर आयपीएलमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. ४ मे रोजी केकेआरच्या दोन खेळाडूंची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. यानंतर शनिवारी ८ मे रोजी केकेआरचा यष्टिरक्षक फलंदाज टिम सिफर्टलाही कोरोनाची लागण झाली.

तर शनिवारी सायंकाळपर्यंत केकेआरच्या संघातील महत्वाचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचाही कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. यासह वरुण चक्रवर्ती, संदिप वॉरीयर, टिम सिफर्ट नतंर प्रसिद्ध हा केकेआरचा चौथा खेळाडू आहे. ज्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. एक दिवस आधिच प्रसिद्धची भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी संघात निवड झाली होती. या दौऱ्यातील राखीव खेळाडूत प्रसिद्धचा समावेश करण्यात आला होता.

या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयनं पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कृष्णा सध्या त्याच्या बंगळुरुतील घरात आयसोलेशनमध्ये आहे. सर्व भारतीय खेळाडूंनी दोनवेळा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर बायो-बबल सोडले. कृष्णाला बंगळुरुतील घरी पोहचल्यानंतर कोरोनाची लागण झाली. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी असलेल्या बायो-बबलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी कृष्णा कोरोनामधून बरा होईल, अशी आशा बीसीसीआयनं व्यक्तं केली आहे.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!