Share

बीडमध्ये नोंदणी करूनही मिळेना लस

Published On: 

बीड: १ मे पासून राज्यभरात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस देण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्याने पाहिजे तेवढ्या लस जिल्ह्यात उपलब्ध होत नाहीयेत. अनेकांना लसीसाठी थांबावं लागत असल्याने तरुणांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.  ऑनलाईन नोंदणी करूनही लस मिळत नसल्याने तरुणांमधून संताप व्यक्त होत आहे.

अशा प्रकारामुळे अनेकांनी ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. शिवाय जिल्हा रूग्णालय असो की अन्य ठिकाणचे लसीकरण केंद्र सर्वच ठिकाणी दिवसात २०० जणांची बुकींग झाली की इतरांना लस मिळत नाही. सरकारने लसीकरणासाठी ऑनलाईन नाव नोंदणी बंधनकारक केली आहे तर लसीकरणासाठीची अपॉईन्मेंट तात्काळ का मिळत नाही असा सवालही तरूणांनी आरोग्य विभागाला केला आहे.

सध्या १८ ते ४४, ४५ ते ६० व ६० पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना भारत बायोटेकची कोव्हिशिल्ड आणि सिरम इन्स्ट्यिुटची कोव्हॅक्सीन ही लस दिली जात आहे. १ मे पासून मोजक्या केंद्रावर १८ ते ४४ या वयोगटातील लाभार्थ्यांनाही लसीकरण सुरू करण्यात आले. परंतु या केंद्रावर लसींचा तुटवडा असल्याने अनेकांना प्रतीक्षेत थांबावे लागत आहे.

लसीकरणासाठी नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, मात्र आरोग्य विभागाने केवळ १८ ते ४४ या वयोगटासाठी ऑनलाईन बुकींग नंतरच लस मिळेल हे जे बंधन घातले आहे ते बरोबर असले तरी नोंदणी होईल तितक्या प्रमाणात दररोज लसीचे डोस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी स्वीकारावी व या संबंधीचे नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!