नवी दिल्ली : आयपीएल 2021 चा दुसरा भाग यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, परंतु त्याआधीच या लीगच्या तीन संघांना मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड क्रिकेट संघाच्या तीन खेळाडूंनी आयपीएल खेळण्यास नकार दिला आहे. या तीन खेळाडूंमध्ये अनुभवी फलंदाज डेव्हिड मलान, अष्टपैलू ख्रिस वोक्स आणि तुफानी फलंदाज जानी बेअरस्टो यांचा समावेश आहे.
डेव्हिड मलान सध्या पंजाब किंग्जचा भाग आहे, तर ख्रिस वोक्स दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग आहे. आणि जॉनी बेअरस्टो हा सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग आहे. आयपीएल 2021 च्या लिलावात पंजाब किंग्सने इंग्लंडचा तुफानी फलंदाज डेव्हिड मलानला खरेदी केले होते. आता डेव्हिड मलानच्या जागी अॅडम मार्करामचा पंजाब संघात समावेश केला जाईल.
मलानची बदली म्हणून पंजाब किंग्सने दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज अॅडेम मार्करामला करारबद्ध केले आहे. पंजाब किंग्सने एक निवेदन जारी करून मार्कराम संघात सामील झाल्याची घोषणा केली. आयपीएल सुरू होण्यापूर्वी पंजाब किंग्सने दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एडन मार्करामला संघात समाविष्ट केले आहे.
दरम्यान, आयपीएल 2021 चे पहिले 29 सामने भारतात खेळले गेले आहेत, परंतु कोविड -19 महामारीमुळे ते पुढे ढकलण्यात आले होते. आता या लीगचे उर्वरित 31 सामने यूएईमध्ये खेळले जातील. त्याचा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. यानंतर, यूएईमध्येच टी -20 विश्वचषकाचे आयोजन केले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
- तीन आयपीएल संघांना मोठा धक्का; बड्या खेळाडूंची माघार
- Ind vs Eng: 2022 मध्ये घेतला जाईल टी-२० मालिकेचा निर्णय
- ‘शिवसेनेतील नेत्यांकडूनच मुख्यमंत्री ठाकरेंची दिशाभूल’, मुनगंटीवार यांची टीका
- खाद्यतेलावरील आयात शुल्कात कपात, हा शेतकऱ्यांना आणखी एक धक्का – तुपकर
- ओबीसी समाजाला धक्का : राज्य सरकारला निवडणुका पुढे ढकलता येणार नाही – सर्वोच्च न्यायालय


