मुंबई :- मंदिर उघडण्यासाठीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याआधी वंचित, एमआयएम यांनी मंदिर उघडण्याची मागणी केली होती. आता यात भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांची भर पडली आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर मंदीरं उघडावीत नाही तर, आम्हाला स्वतः मंदीरं उघडावी लागतील असा इशारा तुषार भोसले यांनी सरकारला दिला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी एक वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. राज्यातील भाविक जनतेची भावना लक्षात घेऊन आज तरी मंदिरे सुरु करण्यासंदर्भात घोषणा करतील, अशी आशा आहे. मात्र तसे न झाल्यास 18 सप्टेंबर रोजी अधिक मास प्रारंभ होत आहे. या दिवशी नाईलाजाने आम्हाला स्वतःहून मंदिरे उघडावी लागतील, असा इशारा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दिला आहे.
ज्यातील मंदिरे खुली करण्यात यावी, या मागणीसाठी भाजपनं गेल्या महिन्यात ‘दार उघड उध्दवा दार उघड’ या आंदोलनाला सुरुवात केली होती. या आंदोलनाला आध्यात्मिक समन्वय आघाडीने पाठिंबा दिला होता.हे घंटानाद आंदोलन म्हणजे ठाकरे सरकारसाठी धोक्याची घंटा आहे. हे जर असंच सुरु राहिलं तर हाच घंटानाद या ठाकरे सरकारचा कर्दनकाळ ठरेल, असे खोचक वक्तव्य आचार्य तुषार भोसले यांनी केलं होतं.
दरम्यान, दुसरीकडे शिर्डीत साईबाबा मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी मनसे आक्रमक झाली आहे. साईमंदिर खुले करा अन्यथा आम्ही स्वतः खुले करून मंदिरात प्रवेश करू, असा इशारा मनसेनं दिला आहे,कोरोनामुळे राज्यभरात लॉकडाऊन लागू झाला. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून राज्यातील मंदिर अद्यापही बंद आहे. केंद्राने सुचना दिल्यानंतरही राज्यातील मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता शिर्डीतील साईबाबांचे मंदिर उघडण्यासाठी मनसे आंदोलन केले.
शिर्डीचे साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करा, संस्थान कर्मचार्यांचा वेतन कपातीचा निर्णय मागे घ्या, या मागणीसाठी आज मनसेच्या वतीने शिर्डीत आंदोलन करण्यात आले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या:-
- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांनी ओलांडला ३० हजारांचा टप्पा!
- सर्व नागरिकांनी नियम पाळावे, आता लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणावर घाला घातला- बाळासाहेब मुरकुटे
- पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या- मोनिका राजळे
- अहमदनगरमध्ये जनता कर्फ्यू, लॉकडाऊन नकोच; काँग्रेसचे जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

