Share

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांनी ओलांडला ३० हजारांचा टप्पा!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर, शेवगाव, अकोले, श्रीगोंदा ह्या तालुक्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. बघता बघता जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांनी ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. काल नव्याने ५०१ कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ३० हजार १५ एवढा झाला आहे. जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या पाहता अहमदनगर शहर व जिल्ह्यात १० ते १२ दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची मागणी सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी करीत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात दररोज पाचशेच्या वर कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. काल दिवसभरात आणखी १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत ४६२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २५ हजार ४३७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर ४ हजार ११६ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३० हजारांच्या पुढे गेल्याने, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अहमदनगर शहरासह जिल्ह्यात दहा ते बारा दिवस लॉकडाऊन करून, जनता कर्फ्यू लागू करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!