🕒 1 min read
मुंबई : “एस टी कामगार २२ एप्रिल पर्यंत कामावर आले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्हाला मोकळीक आहे. आम्ही २२ एप्रिल पर्यंत कामगारांची वाट पाहू,त्यानंतर आम्ही असे समजू की, कामगारांना कामाची गरज नाही. २२ एप्रिल नंतर कामावर रुजू न होणाऱ्या कामगारांवर योग्य ती कारवाई करायला आम्ही मोकळे आहोत,” असे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना परब म्हणाले, “कामगारांवर राज्य सरकार कोणत्याही प्रकारचं अन्याय करत नाही. कामगारांनीं उच्च न्यायालयाचे निर्देशांचं पालन करावं. त्यांना भविष्य निर्वाह निधी व ग्रॅच्युइटी राज्य मिरजकर देत आहे. तो त्यांचा अधिकारच आहे. म्हणून कोणावरही होणार नाही.”
“कामगारांनी सदावर्ते यांच्या नादी लागून नुकसान करून घेऊ नये. कामगारांनी आपला योग्य नेता निवडावा. न्यायालयाचे निर्देशांच पालन करावं. कामावर २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावे असं आवाहन करतो.”
महत्वाच्या बातम्या :
“मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है” म्हणत शालिनी ठाकरेंचा सुजात आंबेडकरांवर हल्लाबोल
IPL 2022 : “चेंडू हवेत तरंगत होते…”, पॅट कमिन्सला आपल्या विक्रमी खेळीवर विश्वास बसेना; वाचा काय म्हणाला तो!
“कोंबडं कितीही झाकलं तरी पहाट व्हायची…”, काँग्रेसचा मोदींवर निशाणा
“…यामध्ये राज्य सरकारचे कोणतेही योगदान नाही”, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राणेंचा टोला
“शब्द मोजून वापरले पाहिजेत”; रोहित पवारांचा राऊतांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
