Share

“मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है” म्हणत शालिनी ठाकरेंचा सुजात आंबेडकरांवर हल्लाबोल

Published On: 

मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला माझा विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील, जर भोंगा दिसलाच तर त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार, असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाल्याचे बघायला मिळत आहे. असे असतांनाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी ‘मुस्लिम बांधवांच्या अंगाला हात लावू देणार नाही. त्यांची जबाबदारी आता आमची आहे’, असे म्हणत थेट राज ठाकरेंना आव्हान दिले.

सुजात आंबेडकर यांच्या या वक्तव्यावर आता मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी टीका केली आहे. यासंदर्भात शालिनी ठाकरे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,‘मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है…सुजात यांना कोणी मध्ये बोलायला सांगितले आहे, तुमचे राजकारणातले वय काय, आपण कोणाबद्दल बोलतोय आणि काय बोलतोय याची तरी समज आली आहे का?’, असा खोचक सवालही शालिनी यांनी केला आहे.

दरम्यान, ‘जर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना हनुमान चालीसा लावा असे सांगण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? महाविकास आघाडीने पुरोगामीत्वाची चादर पांघरलीय, आता तर संधी आहे त्यांनी राज ठाकरेंवर कारवाई करावी. त्यांनी मशिदीसमोर दुप्पट स्पिकर लावून हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिल्याच्या वक्तव्यावर आमचा आक्षेप आहे. राज ठाकरे यांनी संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करु नये’, असेही सुजात आंबेडकर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!