Share

IPL 2022 : “चेंडू हवेत तरंगत होते…”, पॅट कमिन्सला आपल्या विक्रमी खेळीवर विश्वास बसेना; वाचा काय म्हणाला तो!

Published On: 

पुणे : पॅट कमिन्सच्या (नाबाद ५६) विक्रमी अर्धशतकाच्या जोरावर बुधवारी आयपीएल २०२२ च्या १४व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव केला. पुण्यातील एमसीए स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून १६१ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने १६ षटकांत ५ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.

कमिन्सने १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण करून केएल राहुलसह संयुक्त सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे. कमिन्सने आपल्या खेळीत ६ षटकार आणि ४ चौकार लगावले. या झंझावाती खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मॅन ऑफ द मॅच कमिन्स सामन्यानंतर म्हणाला, ”मला या खेळीने अधिक आश्चर्य वाटले. फक्त धावा झाल्या. मी जास्त विचार करत नव्हतो. हे खरोखर समाधानकारक आहे. चेंडू हवेत तरंगत असल्याचे दिसत होते. गेल्या वर्षीचा दबदबा कायम राखण्यात आम्ही भाग्यवान आहोत. आजच्या कामगिरीने खूप आनंद झाला. मेगा लिलावानंतर गेल्या वर्षीच्या तुलनेत बरेच बदल झाले आहेत. संघात टॅलेंटचा चांगला मिलाफ आहे.”

केकेआरसाठी कमिन्स सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने तुफानी फलंदाजी केली. झटपट फलंदाजी करत कमिन्सने १४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने १५ चेंडूत नाबाद ५६ धावा करत केकेआर संघाला विजय मिळवून दिला. यादरम्यान त्याने ६ षटकार आणि ४ चौकार लगावले. कमिन्सने धडाकेबाज फलंदाजी करताना डॅनियल सॅम्सच्या एका षटकाला पूर्णपणे लक्ष्य केले आणि ३५ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!