Share

“कोंबडं कितीही झाकलं तरी पहाट व्हायची…”, काँग्रेसचा मोदींवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पत्रकार म्हणजे लोकशाहीचा चौथा खांब आणि हाच खांब डळमळीत करुन मोदी आपली हुकूमशाही कायम करु पाहतायत. पक्षांतर्गत तसेच पक्षाच्या बाहेर सगळ्यांचीच मुस्कटदाबी करुन आपण सत्य दडपू शकतो असं जर मोदींना वाटत असेल तर हा त्यांचा भ्रम आहे. कारण कोंबडं कितीही झाकलं तरी पहाट व्हायची राहत नाही. अशी टीका करत कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

तसेच भाजपमधील अंतर्गत धुसपूस उघड करताच पत्रकाराने नोकरी गमावल्याचा दावाही कॉंग्रेसने ट्वीट करत केला आहे. दरम्यान काँग्रेसकडून इंधन दरवाढीवरून सतत मोदी सरकारला टार्गेट केले जात आहे. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्त्वाखाली महागाई मुक्त भारत अभियानांतर्गत इंधन दरवाढ व महागाईविरोधात भारतीय विद्या भवन ते ऑगस्ट क्रांती मैदान मोर्चा काढण्यात आला.

तसेच इंधन आणि गॅसच्या दरात सातत्याने वाढ करून कमावलेले हजारो कोटी रूपये गेले तरी कुठे? मोदीजी उत्तर द्या, जनतेच्या पैशांचा हिशोब द्या! पेट्रोल डिझेल गेले शंभरी पार तरी नाही थांबली मोदी सरकारची लुटमार अशा शब्दांत कॉंग्रेसने संताप व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

निवडणुका आल्या की राष्ट्रवादीही घेतेय हिंदुत्वाचा आधार, मग राज ठाकरेंवर टीका का?

वाढत्या पेट्रोल-डीझेल किमती विरोधात राष्ट्र्वादी पक्ष आंदोलन करणार- अजित पवार

“…मग नंतर तुमच्या भूमिकेत बदल का झाला?”, अतुल भातखळकरांचा शरद पवारांना सवाल

“पुणे अध्यक्षपदावरून हाकलल्यानंतरही मी मनसेतच राहणार” – वसंत मोरे

IPL 2022 : एक ओव्हर आणि ३५ रन्स..! मुंबईच्या गोलंदाजाला कमिन्सनं धुतलं; पाहा तुफानी बॅटिंगचा VIDEO!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!