पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी खासदार संजय राऊत यांना सल्ला दिला. म्हणाले, सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना शब्द हे मोजून वापरले पाहिजेत.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी असंसदीय आणि खालच्या भाषेत किरीट सोमय्या यांच्यावर टिका केली आहे. राऊत यांच्या शिवराळ भाषेविषयी सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त केल्याची पाहायला मिळते.
त्यावर आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही संजय राऊत यांना सल्ला दिला. कारवाई केल्यानंतर त्यांची भावना आपण समजू शकतो. भाजप सुड भावनेने कारवाई करत आहे. त्यामुळे अशा पद्धतीने भावना व्यक्त केली आहे. परंतु बोलताना सर्वच राजकीय नेत्यांनी मोजून वापरले पाहिजेत असा सल्ला आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या –
“…मग नंतर तुमच्या भूमिकेत बदल का झाला?”, अतुल भातखळकरांचा शरद पवारांना सवाल
“पुणे अध्यक्षपदावरून हाकलल्यानंतरही मी मनसेतच राहणार” – वसंत मोरे
IPL 2022 : एक ओव्हर आणि ३५ रन्स..! मुंबईच्या गोलंदाजाला कमिन्सनं धुतलं; पाहा तुफानी बॅटिंगचा VIDEO!
सत्ताधाऱ्यांना सणसणीत उत्तर देण्यासाठी राज ठाकरेंची होणार ‘उत्तर’सभा
शहरप्रमुख पदावरुन हटवल्यानंतर वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले “आरे मी तर कधी पासूनच…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

