Share

उर्वरीत आयपीएल स्पर्धा रद्द झाली तर ‘इतक्या’ कोटीचे नुकसान, गांगुलीने केला खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.

आयपीएल स्पर्धेत २९ सामने झाले आहेत, तर ३१ सामने खेळायचे बाकी आहेत. उर्वरीत आयपीएल सामन्यासाठी भारताला अनेक देशातुन निमंत्रण आले आहे. मात्र बीसीसीआयने याबाबत कोणताही निर्णय घेतला नाहीये. यादरम्यान जर उर्वरीत आयपीएल स्पर्धा रद्द झाली तर तब्बल २००० कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागेल असे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने सांगितले आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गांगुलीने हा खुलासा केला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे आगामी क्रिकेटचे वेळापत्रक हे व्यस्त आहे. टी-२० विश्वचषकापुर्वी हा हंगाम पुर्ण होऊ शकतो. मात्र अजुनही याबाबत कोणाताही अंतिम निर्णय झालेला नाहीये. तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत शंका उपस्थीत केली जात आहे. भारतातील कोरोना स्थितीवर टी-२० विश्वचषकाच्या आयसीसीची नजर आहे. जर भारतात परिस्थीती सुधारली नाही तर विश्वचषक हा युएईमध्ये खेळवण्याचा विचार सुरु आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!