Share

‘तुमच्या आयुष्यातील प्रेमळ व्यक्तींना घट्ट धरुन ठेवा’ आईनंतर बहिणीला कोरोनामुळे गमानवल्यानंतर महिला क्रिकेटपटुचे ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या लाटीत अनेक मान्यवरांना या विषाणुची लागण झाली आहे. या काळात अनेक रुग्णांना अपुऱ्या औषधामुळे आपला जिव गमवावा लागत आहे. तसेच अपुऱ्या ऑक्सिजनमुळेही अनेक रुग्णांना जिव गमवावा लागत आहे.

भारतीय महिला क्रिकेट संघाची सदस्य असलेली वेदा कृष्णुमुर्तीच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. काही दिवसापुर्वी वेदाची आई चेलूवंबदा देवी यांचे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले होते. ही माहीती स्वतः वेदा कृष्णमूर्तीने ट्विट करुन दिली होती. आईच्या दु:खातुन सावरण्याआधीच वेदाला आणखी एक धक्का बसला आहे. तिच्या बहिणीचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. वेदाने स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली. या ट्विटमध्ये ती म्हणाली,’मोठ्या दु:खद अंतकरणाने मला आणि माझ्या कुटुंबाला माझी लाडकी बहिण अक्काला निरोप द्यावा लागला. माझे जग असलेली बहिण काळाच्या पडद्याआड गेली. या कठीण काळात तुम्ही केलेल्या प्रार्थनेबद्दल सर्वाचे आभार. तुम्ही ज्यांच्यावर जिवापाड प्रेम करता त्यांना आत्ताच घट्ट धरुन ठेवा आणि सुरक्षित रहा’ असे ट्विट केले आहे.

आईपाठोपाठ बहिणीला कोरोनामुळे गमावल्यामुळे वेदावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वेदाने काही दिवसापुर्वीच कोरोनावर मात केली आहे. मात्र तिची आई आणि बहिण मात्र ही लढाई हारल्या. वेदा कृष्णमुर्तीने ४८ एकदिवसीय सामन्यात ८२९ धावा केल्या आहेत. त्यामध्ये आठ अर्धशतके आपल्या नावे केली आहेत. त्याबरोबरच तीन बळीही घेतले आहेत. तसेच तिने ७६ टी-२० सामन्यात खेळताना २ अर्धशतकांसह ८७५ धावा केल्या आहेत. तसेच ती घरगुती क्रिकेटमध्ये कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्वही करते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!