Share

‘माणुसकी म्हणून सुद्धा उत्तर प्रदेश सरकारची ही भूमिका घृणास्पद आहे’ : शरद पवार 

Published On: 

पुणे : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील, असा इशारा महाराष्ट्र कॉंग्रेसने दिला आहे.

देशभरातून या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी विविध प्रकल्पाबाबत सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना हाथरस प्रकरणासह राहुल गांधी यांना करण्यात आलेल्या धक्काबुक्की संदर्भात प्रश्न केला असता आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘दुर्दैवाने असे प्रकार वाढत आहेत. महाराष्ट्रात देखील एकेकाळी काही घटना घडल्या, मात्र  उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकरणावर आक्षेप घेतले असता सरकारची भूमिका बघ्याची आहे’ असे ते म्हणाले. ‘उत्तर प्रदेश सरकार पीडितांना भेटू देखील देत नाही म्हणजे ते कायद्याचं राज्य किंवा मूलभूत अधिकार याच्यावर त्यांचा कवडीचाही विश्वास नाही हे स्पष्ट होतंय. तर या प्रकरणाकडे राजकीय दृष्ट्या न बघता माणुसकी म्हणून सुद्धा उत्तर प्रदेश सरकारची ही भूमिका घृणास्पद आणि निंदनीय आहे’ अशा शब्दांत उत्तर प्रदेशच्या योगी सरकारवर शरद पवार यांनी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!