Share

शिवसेनेचा वचननामा ही तर जनतेची फसवणूक : आपची पोलिसात तक्रार

Published On: 

पुणे- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ मध्ये शिवसेना प्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यातून राज्यातील वीज ग्राहकांना (जनतेला) दहा वचने दिले होते. त्यामध्ये प्रामुख्याने ३०० युनिटपर्यंत वीज  वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीजदर ३० टक्क्यांनी कमी करणार असे वचन होते. अत्यंत महत्वाच्या आश्वासनाचा प्रचार त्यांनी विडीओ, पत्रके, भाषणे, ट्विटर अश्या विविध माध्यमातून केला होता. त्या वचनांवर विश्वास ठेवून राज्यातील जनतेने शिवसेनेच्या ५६ उमेदवारांना निवडून दिले आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

यामुळे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळल्यानंतर राज्यातील जनतेला दिलेली वचन पाळणे त्यांची राजकीय आणि नैतिक जवाबदारी होती, परंतु यांनी दिलेले वचन न पाळून जनतेची फसवणूक केलेली आहे. या उलट देशात आणि राज्यात महामारीचे संकट असतांना दि.१ एप्रिल २०२० पासून वीज दरवाढ करून राज्यातील जनतेला फसवले आहे असा आरोप ‘आप’ने केला आहे.

फसवले गेलेल्या जनतेला घेऊन आम आदमी पार्टीने वीजबिल माफी व किमान वीजदर कपातीची मागणी मुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे. त्यासाठी सोशल मिडिया वरून मागणी, निदर्शने, इमेल पत्र व पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे वीजबिल माफ करण्याचे वा दरकपातीसाठी हजारो अर्ज मुख्यमंत्री कार्यालयाकडे दिले आहेत. पालक मंत्र्यांच्या घराचा घेराव, वीज कार्यालयांना ताला ठोको अशी आंदोलन केली परंतु सरकारने यास प्रतिसाद दिलेला नाही असा आरोप ‘आप’ने केला आहे.

ज्या अर्थी सरकारपक्ष असलेले शिवसेनेचे मुख्यमंत्री निवडणुकी दरम्यान दिलेले आश्वासन पाठपुरावा करूनही पाळत नाही त्याअर्थी ही जनतेची जाणीवपूर्वक केलेली फसवणूक आहे. भारतीय दंड संहिता कलम ४१५ ( फसवणूक ) आणि ४२० ( अप्रामाणिकपणा – बेईमानी ) प्रमाणे हा गुन्हा आहे . तसेच लोकप्रतिनिधी कायदा कलम १२३ (ब) (भ्रष्ट व्यवहार-पद्धती) प्रमाणे मते मिळवण्यासाठी खोटी आश्वासने देता येत नाहीत. ही जनतेची फसवणूक ठरते असा आरोप ‘आप’ने म्हटलं आहे.

याच पद्धतीने जर आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत असेल तर त्या व्यक्ती वा संस्थेवर IPC ४२० अनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतात. अशाच प्रकारचे आमिष दाखवून राज्यात उद्धव ठाकरे राज्याचे मा.मुख्यमंत्री झाले आहेत व आता जाणीवपूर्वक आश्वासन न पाळून जनतेची फसवणूक करीत आहेत. एवढेच नव्हे तर महामारी च्या संकट काळी वीजदर वाढवून जनतेसोबत बेईमानी केली आहे असं ‘आप’ने म्हटलं आहे.

महामारीच्या संकटामुळे पिडीत आणि फसवल्या गेलेल्या जनतेच्या वतीने राज्याचे मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आम आदमी पार्टी तर्फे २ ऑक्टोम्बर,गांधी जयंती रोजी सत्याचा आग्रह म्हणून राज्यभरात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही पोलिस तक्रार पुणे (जिल्हा)स्वारगेट पोलीस ठाणे शब्बीर सय्यद, पोलीस निरीक्षक, गुन्हे ,स्वारगेट पोलीस ठाणे यांचेकडे करण्यात आली. या वेळी शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत, संघटन मंत्री डॉ अभिजित मोरे, राज्य वाहतूक आघाडी प्रमुख श्रीकांत आचार्य, सतीश यादव, विक्रम गायकवाड, ऋषिकेश मारणे, संदेश दिवेकर,मनोज थोरात, गणेश ढमाले हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!