कोल्हापूर : राज्यात होणाऱ्या राजकीय हालचालींच्या मुद्द्यावर संभाजीराजे भोसले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. कुठे जायचं कुठे नाही हा शिवसेनेचा वैयक्तिक अधिकार असल्याच ते यावेळी म्हणाले.
ज्या कोणाचे सरकार येईल त्यांनी सामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, कष्टकऱ्यांचे, समाजाचे प्रश्न सोडवले पाहीजे असं मत त्यांनी मांडलय. जे काही गेल्या पंधरा दिवसात घडलंय ते बरोबर नसल्याच संभाजीराजे म्हणाले आहेत.
राज्यसभेत मला पुरस्कृत उमेदवारी दिली असती तर हा खेळखंडोबा झालाच नसता असंही संभाजीराजे म्हणाले. ज्या कोणाचे सरकार येईल त्यांनी सामान्य माणसांचे, शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, कष्टकऱ्यांचे, समाजाचे प्रश्न सोडवले पाहीजे असं मत त्यांनी मांडलय.
महाविकास आघाडीच्या राजकारणावर बोलण्याची इच्छा नसल्याची भूमिका संभाजीराजेंनी स्पष्ट केली आहे. दरम्यान,संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याला संभाजीराजेंनी उपस्थितीत दर्शवली.
महत्त्वाच्या बातम्या-


