Share

Aditya Thackeray : घोटाळे, लफडी करायची तुम्ही आणि हे लपवायला पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसायचा; आदित्य ठाकरे आक्रमक

Published On: 

Aditya Thackeray। मुंबई : ४० आमदारांनंतर शिवसेनेतील खासदार देखील शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र काल लोकसभेतील शिवसेनेच्या १९ पैकी किमान १२ खासदारांनी स्वतंत्र गट तयार करण्याची मागणी केली आहे. तसेच हे १२ खासदार आता शिंदे गटात सामील झाले आहेत. या संदर्भात खासदारांनी काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पत्र दिल आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला (शिवसेना) हा मोठा झटका मानल्या जात आहे. यासंदर्भात आता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या राज्यभर आदित्य ठाकरे यांची निष्ठा यात्रा सुरु आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले कि, ही बंडखोरी नसून गद्दारी आहे. तुमच्यावर दडपण असेल, तुमच्या काही फाईल्स उघडल्या असतील. पण घोटाळे करायचे तुम्ही, लफडी करायची तुम्ही आणि लपवायला कोणाच्या पाठीत खंजीर खुपसायचा तर पक्षप्रमुखांच्या, अशा शब्दात त्यांनी बंडखोर शिवसेना नेत्यांवर निशाणा साधलाय. शिवसेना आमदार आणि खासदारांमध्ये फूट पडल्याने सध्या ठाकरे गटाच्या शिवसेनेमध्ये खळबळ माजली आहे.

तसेच पुढे शिवसेनेशी गद्दारी करायची नंतर बोलायला मोकळे आम्ही हिंदुत्वासाठी गेलो, महाराष्ट्र धर्मासाठी गेलो. हे सगळं थोतांड आहे. त्यांना स्वत:ला वाचवायचं होतं म्हणून त्यांनी आमच्याबरोबर गद्दारी केलीय, असं आदित्य शिवसैनिकांसमोर दिलेल्या भाषणात म्हणाले. तसेच ही बंडखोरी नसून गद्दारी असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी या बंडखोर नेत्यांची वेगवेगळी प्रकरणं उघड झाल्याने त्यांनी शिवसेनेविरोधात भूमिका घेतल्याचा स्पष्ट आरोप केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!