🕒 1 min read
मुंबई : टीम इंडिया मर्यादित षटकांच्या मालिके खेळण्यासाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोहोचली आहे. या दौऱ्याची सुरुवात २३ जुलैपासून ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेने होणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माला वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी अनुभवी शिखर धवन वनडे मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे. यानंतर रोहित पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघात परतणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेकदा मजेदार व्हिडिओ शेअर करणाऱ्या शिखरने इंस्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये टीम इंडिया पूर्ण जोशात दिसत आहे. हा व्हिडिओ विमानतळावरील असल्याचे दिसत आहे.
शिखर धवनने शेअर केलेल्या मजेशीर व्हिडिओमध्ये टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडची एन्ट्री सर्वात खास दिसत आहे. द्रविडही बाकीच्या खेळाडूंसोबत विमानतळातून बाहेर पडताना दिसत आहेत. या व्हिडिओवर दिनेश कार्तिकने खास कमेंट केली आहे. त्याने लिहिले की, असे स्टंट फक्त शिखरच करू शकतो. बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग देखील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वत:ला थांबवू शकला नाही आणि त्याने त्या व्हिडिओला नंबर म्हटले आहे.
धवनची इंग्लंडविरुद्ध कामगिरी चांगली राहिली नाही
शिखर धवन अजूनही भारतीय एकदिवसीय संघासाठी महत्त्वाचा भाग आहे. पण, तो कसोटी आणि टी-२० संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडला आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्याने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसह भारतीय वनडे संघात पुनरागमन केले. भारताने ही एकदिवसीय मलिका२-१ ने जिंकली होती. मात्र, या मालिकेत धवनची कामगिरी काही खास राहिली नव्हती. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने नाबाद ३१ धावांची खेळी केली. पण, पुढच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत राहिली आणि तो ९ आणि १ धावा करून बाद झाला. अशा परिस्थितीत त्याची नजर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत पुन्हा फॉर्म मिळविण्यावर असेल. कर्णधार आणि सलामीवीर अशी दुहेरी भूमिका बजावण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.
https://www.instagram.com/reel/CgMaipqJlAz/?igshid=YmMyMTA2M2Y=
युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी
रोहित शर्माशिवाय विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशा स्थितीत शुबमन गिल, इशान किशन, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग या खेळाडूंना एकदिवसीय मालिकेत स्वत:ला सिद्ध करण्याची संधी असेल.
महत्वाच्या बातम्या :
- Aditya Thackeray : घोटाळे, लफडी करायची तुम्ही आणि हे लपवायला पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसायचा; आदित्य ठाकरे आक्रमक
- Uddhav Thackeray vs Eknath Shinde | प्रकरण मोठ्या खंडपीठात जाण्याची शक्यता, पुढील सुनावणी १ ऑगस्टला
- IND vs WI : वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतीय संघाला करावा लागणार ‘या’ संकटांचा सामना; वाचा सविस्तर…!
- Shinde Vs Thackeray : “…तर हायकोर्टात का गेला नाहीत”, सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला सवाल
- Sanjay Raut : “हे तर जो बायडेनचं घरही ताब्यात घेतील”; एकनाथ शिंदे गटावर संजय राऊतांची टोलेबाजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
