Share

गावाचे नेतृत्व सक्षम असल्यास विकासाला चालना मिळते – रावसाहेब दानवे

Published On: 

औरंगाबाद : गावाचे नेतृत्व सक्षम असल्यास विकासाला चालना व योग्य दिशा मिळते. राजकारणात बदल घडत असतात. नव्याने नेतृत्व उदयास येऊन नवीन कार्यकर्ते घडत असतात. मात्र गावाचा विकास हेच ध्येय समोर ठेऊन भाजपच्या प्रत्येक कार्यकत्र्यांनी कार्य करण्याची गरज आहे. असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सिल्लोड तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या जाहीर सत्कार समारंभ निमित्ताने बोलताना केले
यावेळी बोलताना दानवे म्हणाले की सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्या असून, सर्व हेवे दावे सोडून गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना केले.
यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक तरुण निवडून आले आहेत . या तरुण सदस्यांनी असे काम करावे की गावकऱ्यांनी म्हणाले पाहिजे पहिल्यांदा निवडुन आला पण याने गावात चांगले काम केले आहे . राजकारणात पुढे जायचे असेल तर आधी लोकांचा विश्वास संपादन करा . कारण लोकांचा विश्वास संपादन केल्या शिवाय पुढे जाताच येत नाही. राज्यातील तीन पक्षाचे तिघाडी चे सरकार हे शेतकरी विरोधी असून ऐन संकटाच्या काळात रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्याच्या उंबरठ्यावर शेतक – यांचा वीजपुरवठा खंडित केला असून शेतक – यांना संकटात आणले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण लढा दिला पाहिजे असे यावेंळी बोलताना सांगितले

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!