Share

तपास यंत्रणा चुकत असतील तर न्यायव्यवस्था त्यांना फोडून काढेल- सुधीर मुनगंटीवार

Published On: 

मुंबई : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी एनसीबीवर झालेल्या गंभीर आरोपानंतर हे प्रकरण आता वेगळ्या वळण लागल्याचं पाहायला मिळाला आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनीही या प्रकरणात आपण कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार असल्याचं सांगितलं आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सरकारवर टीका केली आहे.

तपास यंत्रणा चुकत असतील न्यायव्यवस्था निर्णय घेईल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. एनसीबीच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या या वादावर बोलताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ड्रग्सचा आरोप असलेल्या तरूणाला वाचवण्यासाठी राज्य सरकार सगळी शक्ती पणाला लावतंय, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी एनसीबीवर केलेल्या आरोपांवर ते म्हणाले की, या राज्यातल्या तरुणांना दीशा देण्याची जबाबदारी आहे, ते या ड्रग्ज प्रकरणातील तरुणाला वाचवताय, आणि केंद्रीय यंत्रणांना दोष देण्याचं काम करताय असंही ते म्हणाले. ड्रग्जमुळे महाराष्ट्र देश बदनाम होतो त्यांचं यांना घेणं देणं नाही, आणि महाराष्ट्र बदनाम होण्याबद्दल बोलताय, असंही मुनगंटीवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!