मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला असून रेकॉर्डब्रेक रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, गर्दी होऊ नये व त्यातून रुग्णसंख्या वाढू नये या साठी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून प्रार्थनास्थळे देखील बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, आता रुग्णांचा आलेख हा काहीसा उतरता असून येत्या काही दिवसांमध्ये लॉकडाऊन टप्प्याटप्याने हटवण्यात येईल असे संकेत सरकारकडून दिले जात आहेत.
दरम्यान, कोरोना संसर्गामुळे मागील वर्षीपासून आषाढी वारी सह कार्तिकी, माघी आणि वारकरी संप्रदायात विशेष महत्व असलेल्या सोहळ्यांवर देखील निर्बंध लावण्यात आले असून मर्यादित स्वरूपात कार्यक्रम केले जात आहेत. आता यंदाच्या वर्षी देखील कोरोनाच सावट कायम आहे. मात्र, अनेक शतकांची परंपरा असलेल्या पायी वारी ला परवानगी द्यावी यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
लाखो वारकऱ्यांचा नित्यनेम असलेल्या आषाढी वारीबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री @OfficeofUT अजूनही टाळताहेत. पालखी सोहळ्याबद्दल सरकारने वेळेत निर्णय घेतला, तर बिघडतं कुठे? ईश्वरसेवेबद्दलचा संभ्रम का वाढवत नेताय? pic.twitter.com/pC5Ibzw5l5
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 7, 2021
पायी वारीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार व वारी नियोजन समित्यांची बैठक झाली असली तरी अद्याप अंतिम निष्कर्ष झालेला नाही. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. ‘लाखो वारकऱ्यांचा नित्यनेम असलेल्या आषाढी वारीबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजूनही टाळताहेत. पालखी सोहळ्याबद्दल सरकारने वेळेत निर्णय घेतला, तर बिघडतं कुठे? ईश्वरसेवेबद्दलचा संभ्रम का वाढवत नेताय?’ असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केलाय.
महत्वाच्या बातम्या
- फडणवीस, खडसे यांच्यानंतर आता रामदास आठवले घेणार शरद पवारांची भेट
- मोदी सरकारनेच अदर पुनावाला यांना धमकी दिली; मुश्रीफांचा गंभीर आरोप
- संतापजनक : समाजकंटक पर्यटकांनी केली तोरणा किल्ल्याच्या बुरुजाची नासधूस
- भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून हिंदू धर्म बदनाम करण्याचा प्रयत्न : सचिन सावंत
- महाविकास आघाडी सरकार हे आरक्षण विरोधी सरकार; रिपाइं चा गंभीर आरोप


