Share

‘पहिला घोटाळा बाहेर आला तर मुश्रीफ हॉस्पिटलमध्ये गेले, आता पुढे त्यांना जेलमध्ये जावं लागेल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अखेर मोठा नाट्यमय घडामोडीनंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे कोल्हापूरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून महालक्ष्मी एक्सप्रेसने निघाले आहेत. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची नोटीस बजावली आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आहे.

सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी आज सकाळपासून त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यांना बाहेर डपण्यास देखील पोलीस मज्जाव करत होते. मात्र कोणतीही ऑर्डर नसताना पोलिसांनी बाहेर पडण्यापासून अडवल्यामुळे सोमय्या हे अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर, भाजपच्या इतर नेत्यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटीच्या घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर कोल्हापुरात करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे मंदिराबाहेरून दर्शन घेऊन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि इतर ठिकाणी जाऊन सोमय्या हे बेनामी मालमत्तेची पाहणी करणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, पोलिसांसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोठा वाद झाल्यानंतर अखेर महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये सोमय्या बसले असून रेल्वे मार्गस्थ झाली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना, हसन मुश्रीफ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तुफानी टीका केली.

पोलीस कोणत्याही अधिकृत ऑर्डरशिवाय केवळ पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्यावरून अटकाव करत आहेत. कारण मुश्रीफ यांचे अनेक मोठे घोटाळे समोर येतील आणि मग पुढे काही खरं नाही. मुश्रीफांचा पहिला घोटाळा बाहेर आला तर त्यांना हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. आता दुसरा आणि मग तिसरा घोटाळा समोर आला की त्यांना जेलमध्ये जावं लागेल, असा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!