Share

रस्त्यांची दुरुस्ती व समस्यांबाबत सुप्रिया सुळेंचे गडकरींना निवेदन

Published On: 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत बारामती लोकसभा मतदार संघातील विविध रस्त्यांची समस्या व इतर मागण्यांचे निवेदन दिले आहे.

नितीन गडकरी हे कात्रज चौक उड्डानपूलाच्या भूमिपुजनासाठी आले होते. यावेळी सुप्रिया सुळे त्यांची भेट घेतली. बारामती लोकसभा मतदार संघातील भोर, कोल्हा, मुळशी, हवेली, दौंड, पुरंदर येथील रस्त्यांच्या समस्येबाबत गडकरींना निवेदन दिले आहे.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी पुढील मागण्या निवेदनात केल्या आहेत. भोर व वेल्हा तालुक्यातील महाड- रानवाडी -कर्णवडी- मढेघाट – केळद – पासली – भट्टी – वेल्हे – आंबवणे – नसरापूर – चेलाडी फाटा हा मार्ग केंद्रीय मार्ग निधी योजनेमध्ये समाविष्ट करावा, तसेच १०६ हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ४८ पुणे बेंगलोर व राष्ट्रीय महामार्ग ६६ मुंबई गोवा या महामार्गांना जोडावा, राष्ट्रीय महामार्ग ४ पुणे सातारा या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय खराब आहे ते काम तातडीने पूर्ण करावे.

गोगलवाडी गावात इंड्रस्ट्रियल ऐरीया असल्याने तिथे व्हेईकल अंडरपास मंजूर करावे, महाड पंढरपूर रस्ता रुंदीकरणासाठी निधी द्यावा, मुळशी तालुक्यातील कोकणात जाणारा एनएच ७५३ या राष्ट्रीय महामार्गावरील भूगाव, पिंरगुट, घोटावडे फाटा व पौंड येथे उड्डानपूल तयार करावा, तसेच या महामार्गाचे चौपदरीकरण अतिशय संथ गतीने सुरु आहे त्याला गती द्यावी, यासह हवेली दौंड पुरंदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे यासह आदी रस्त्यांबाबत मागण्या केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!