🕒 1 min read
नवी दिल्ली:- गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
शेतकरी आंदोलन थांबणार किंवा नाही, हे उद्या (30 डिसेंबर) दुपारी 2 वाजता शेतकरी नेते आणि सरकारमध्ये होणाऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होईल. दरम्यान, भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत म्हणाले की, उद्या होणाऱ्या बैठकीत मागण्या मान्य झाल्या तर ठिक अन्यथा 26 जानेवारीपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत.
उद्या होणाऱ्या बैठकीत आमच्या मागण्यांबाबत तोडगा निघाला नाही, तरी देखील शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरुच राहील. गेल्या 34 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर अजून 34 दिवस आंदोलन करु. 26 जानेवारी रोजी दिल्लीतच प्रजासत्ताक दिन साजरा करु, असे टिकैत म्हणाले आहे.
दरम्यान, नवीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ पंजाब, हरियाणा येथील शेतकरी गेल्या चार आठवड्यांपासून दिल्लीच्या सीमेवर निदर्शने करीत आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, परंतु सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये एकमत झाले नाही. शेतकरी तिन्ही कायदे रद्द करण्यावर ठाम आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले की, आम्ही पंजाबच्या शेतकरी संघटनांसह देशातील अनेक शेतकरी संघटनांशी चर्चा करीत आहोत आणि लवकरच यावर तोडगा निघू शकेल.
महत्वाच्या बातम्या
- फिनिक्स पक्षाप्रमाणे भारतीय संघाची ‘अजिंक्य’ भरारी !
- पुणे : भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- शेतकरी विरोधी भाजपला गावात ‘नो एन्ट्री’, गावात आले तर घातला जाणार चपलेचा हार !
- ‘ईडी : येथे भाजप विरोधातील नेत्यांना नोटीस दिल्या जातात’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
