Share

‘…असं झालं तर टीम इंडिया जिंकली म्हणून समजा’ ; न्यूझीलंडच्या संघ निवडीवर शेन वॉर्नने व्यक्त केली नाराजी

Published On: 

🕒 1 min read

इंग्लंड : काल शनिवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चा अंतिम सामना इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथे खेळवण्यात आला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याला काल सुरुवात झाली परंतु खराब प्रकाशामुळे खेळ लवकर बंद करावा लागला. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट  ११ खेळाडूंची यादी जाहीर केली होती. अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचं ठरवलं.

मात्र दुसरीकडे म्हणजेच न्यूझीलंड संघाने टीममध्ये एकाही स्पिनरला संधी दिलेली नाही. न्यूझीलंडकडे काईल जेमिसन, निल वॅगनर, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट आणि कॉलिन डे ग्रॅण्डहोम या पाच फास्ट बॉलर्सचा टीममध्ये समावेश केला आहे. यावरूनच ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्नने एक स्पिनरची निवड न केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

वॉर्ननं ट्विट करत लिहिले, ” न्यूझीलंडनं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एकही स्पिनर खेळवलेला नाही. त्यामुळे मी खूप निराश आहे. हे पिच स्पिनर्सना मोठी मदत करणार आहे, असं दिसत आहे. तसं खरंच झालं आणि भारताने 275-300 पेक्षा जास्त रन काढले तर मॅच संपलीच म्हणून समजा. त्यानंतर फक्त हवामानच तुम्हाला वाचवू शकेल.” असं भविष्य वॉर्ननं व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!