औरंगाबाद : वेरूळ येथिल बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर उघडण्यासाठी भारतीय जनता पार्टी कडुन घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी मंदिरासमोर महादेवाच्या पिंडीला अभिषेक करुन घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले. यावेळी गेल्या दिड वर्षापासुन ठाकरे सरकारने जानुनबुजुन मंदिरे बंद केली असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच कोरोना हा फक्त मंदिरातून सुरु होतो हा भ्रम निर्माण करुन हिन्दु समाजची मंदिरे बंद ठेवण्यात आली. महाराष्ट्रात सर्वे व्यवसाय सुरू असुन मंदिरे का बंद ठेवण्यात आली असा प्रश्न उपस्थित केला.
मंदिराच्या परिसरातील सर्व व्यवसाय चालकांना उपासमारीची वेळ आली असुन त्यांचा उपजीविका साठी कोणतेही मदत दिली जात नाही. ठाकरे सरकार मंदीरावर अन्याय करीत आहेत. येत्या आठ दिवसांत ठाकरे सरकारने निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मंदिरे उघडण्यासाठी मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिला. मंदिरे उघडण्यासाठी ठाकरे सरकारला गुढगे टेकवायला लावणार असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र अध्यात्मिक अर्चाय तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा अध्यक्ष विजजजी औताडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा संघटक लक्ष्मण राव औटी, ता आध्यक्ष प्रकाश वाकळे, पंचायत समिती सभापती गणेश नाना अधाने, जिल्हा परिषद माजी सभापती भीमराव खंडागळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राहुल निकुंभ, राजेश महाराज देगलुरकर, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज गुळवे, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, उपाध्यक्ष सुरेश मरकड, पंचायत समिती सदस्य प्रभाकर शिंदे, नगरसेवक परसराम बारगळ, योगेश बारगळ, सुखदेव ठेंगडे, गणेश हजारी, गणेश आघाडे, जावेद नावकर, विजय राठोड, आदी उपस्थित होते.
यावेळी मंदिर परिसरात पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलिस निरीक्षक मधुकर मोरे, सि. आय डी विभागाचे सिताराम मेहेत्रे,गोपनीय शाखेचे कारभारी गवळी, तहसीलदार विभागाचे नायब तहसीलदार सतिश देशमुख हे यावेळी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार देशाचे माननीय नेते, त्यांच्यावर आपण काय टीका करणार – राज्यपाल कोश्यारी
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
- १३४ प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानात तब्बल ८०० प्रवासी; विमानाची अवस्था मुंबई लोकलसारखी !
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
