Share

एसटी बंद तर रेल्वे सुरु! बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद :कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशान्वये गुरूवारी (दि.२२) रात्री आठ वाजेपासून ते येत्या १ मेपर्यंत जिल्हाबंदी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदीत एस.टी. महामंडळाच्या बसेस, खासगी ट्रॅव्हल्स बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वेसेवा नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती औरंगाबादचे रेल्वेस्टेशन प्रबंधक एल.के.जाखडे यांनी दिली. रेल्वेसेवा सुरू राहणार असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य शासनाने १४ एप्रिल ते १ मे या काळात लॉकडाऊन जाहीर केला आहे. कडक निर्बंध जाहीर करूनही कोरोनाग्रस्त रूग्ण वाढत असल्याने सरकारने २२ एप्रिल ते १ मे या काळात आणखी काही निर्बंध कडक केले आहे. त्यात बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना जिल्हाबंदी केली आहे. जिल्हाबंदीच्या काळात एस.टी. महामंडळाच्या बसेस आणि खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसची प्रवासी वाहतूक पुर्णपणे बंद केली जाणार आहे. त्यामुळे परजिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांचे येत्या काळात हाल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खासगी ट्रॅव्हल्सच्या जवळपास १०० बसेस या जागेवरच उभ्या असल्याची माहिती औरंगाबाद ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन हौजवाला यांनी दिली. तसेच लॉकडाऊनचा परिणाम खासगी प्रवासी वाहतूकीवरही झाला असून जेमतेम दहा ते पंधरा प्रवाशी घेवून बसेस धावत असल्याने डिझेलचा खर्च, चालक आणि क्लिनरचे वेतन कसे द्यावे, असा प्रश्न खासगी प्रवाशी वाहतूकीचा व्यवसाय करणा-यांसमोर निर्माण झाला असल्याचे त्यांनी नमूद केले.

या मार्गावर सुरू राहणार रेल्वे

जिल्ह्याबंदीच्या काळात मुंबई ते नांदेड, पुणे ते नांदेड, ओखा ते रामेश्वरम, नागरसोल ते नरसापुर, औरंगाबाद ते हैदराबाद, मुंबई ते जालना जनशताब्दी एक्सप्रेस, मनमाड ते सिंकंदराबाद, शिर्डी ते विशाखापट्टणम, मुंबई ते आदिलाबाद, जयपूर ते हैदराबाद, शिर्डी ते कोचीन, शिर्डी ते सिकंदराबाद या मार्गावरील विशेष रेल्वेगाड्या सुरू राहणार असल्याची माहिती औरंगाबाद रेल्वेस्टेशनचे प्रबंधक एल.के. जाखडे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!