Share

नाशिक ऑक्सिजन लीकनंतर औरंगाबादेत मनपा आयुक्त ‘ऑन फिल्ड’!

Published On: 

औरंगाबाद : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि.२१) साडेबाराच्या सुमारास गळती लागली. या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत औरंगाबाद शहरात अशी घटना टाळण्यासाठी शहरातील सर्व दवाखान्यांचे ऑक्सिजन ऑडिट करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी शुक्रवारी (दि.२३) सकाळी साडेअकरापासून शहरातील काही खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन आणि फायर व्यवस्थांची पाहणी सुरु केली आहे.

नाशिकच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मनपाने ऑडिटसाठी स्वतंत्र पथक तयार केले असून मनपाचे हे पथक शासकीय तसेच खासगी दवाखान्यांना भेटी देईल. तेथील ऑक्सिजनच्या स्थितीचे मुल्यमापन करून आवश्यक त्या सूचना करणार आहे. आजपासून आयुक्तांनी देखील स्वतः पाहणीस सुरुवात केली आहे. आज सकाळी शहरातील एमजीएम कोविड रुग्णालयात भेट दिली. त्यानंतर हेडगेवार रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची देखील पाहणी करण्यात आली.

यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, एमजीएमचे अधिष्ठाता डॉ. प्रविण सूर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार यांची उपस्थिती होती. यावेळी याठिकाणी ऑक्सिजन टँकर आला. आयुक्तांनी या ठिकाणी ऑक्सिजन कशाप्रकारे भरले जाते याची पाहणी केली. औरंगाबाद शहरातील रूग्णालयांमधील उपलब्ध ऑक्सिजनचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पालिकेवर सोपवली आहे. त्यानुसार शहरातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये पाहणी करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!