दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला फटकारले असून विरोधकांनी देखील हल्लाबोल केला आहे. दरम्यान, देशातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला अत्यंत गांभीर्याने घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले जात आहे.
अशातच, आता वाढत्या संकटात नागरिकांसाठी मोठी दिलासादायक माहिती समोर येत आहे. झायडस कॅडिला या कंपनीच्या Virafin या औषधाला भारतात परवानगी देण्यात आली आहे. डीसीजीआय ( ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) ने या औषधाच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. महत्वाचं म्हणजे हे औषध कोरोना बाधितांसाठी परिणामकारक ठरणार आहे. कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी हे औषध रामबाण उपाय ठरणार आहे.
Drugs Controller General of India (DGCI) approves emergency use for Zydus Cadila's Pegylated Interferon alpha-2b, ‘Virafin’ for treating moderate #COVID19 infection in adults. pic.twitter.com/bXBvHZaIBp
— ANI (@ANI) April 23, 2021
औषध घेतल्यानंतर अवघ्या सात दिवसात आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह येईल असा दावा देखील कंपीनीद्वारे करण्यात आला आहे. 91.15 टक्के चांगले प्रतिसाद आल्याचे देखील झायडस कॅडिलाद्वारे सांगण्यात आले आहे. यासोबतच, विराफीन हे औषध सौम्य लक्षणे असलेल्या 18 वर्षांवरील व्यक्तिंवर परिणामकारक ठरली आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या औषधाचा निर्माण झालेला तुटवडा कमी होऊन रुग्ण बरे होण्यास अधिक मदत होईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपा का बाबा बंगाली!’ राष्ट्रवादी काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर खोचक टीका !
- चोराने कोरोना व्हॅक्सिन परत केली; जयंत पाटलांनी काळा बाजार करणाऱ्यांना झापलं !
- मदतीचा हात ! पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य मिळणार
- राज्यात सतराशे साठ लोक वेगवेगळं बोलताहेत, ज्याने नुसता गोंधळ झालाय; ‘ई-पास’वरून चित्रा वाघ संतापल्या
- फरार बाबा नित्यानंदच्या ‘मालकी’च्या ‘कैलाश देशा’त पर्यटकांना येण्यास मनाई

