जालना: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यावर मात करण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे, परंतु सध्या कोविशिल्ड व कोवॅक्सीन लसींची उपलब्धता कमी असून काल बुधवारी कोविशिल्डच्या १२हजार ९०० लसी आल्यानंतर त्यातील दहा हजाराच्या जवळपास लसी गुरूवारी संपल्या तर त्यातील उर्वरित लसी आणि ग्रामीण रूग्णालयात उपलब्ध कोवॅक्सीन लसींचा डोस उद्या शुक्रवारी विविध केंद्रांवर दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली.
लसीकरणासाठी जिल्हा पातळीवरील यंत्रणा अगदी झोकून काम करीत आहे. जस जशा लस उपलब्ध होत आहे तस तसे लसिकरण केले जात आहे. काल बुधवारी जिल्ह्याला कोविशिल्डच्या १२९०० लसी प्राप्त झाल्यानंतर सर्व लसींचे संबंधित केंद्रांवर वाटप करण्यात आले. त्यातील सुमारे दहा हजार डोसेस आज दिले गेले असावेत. कोविशिल्डच्या उर्वरीत लस आणि ग्रामीण रुग्णालयांना दिलेल्या अडीच हजारांपैकी आज दिलेल्या वगळून उपलब्ध राहिलेल्या कोवॅक्सीनच्या लसी उद्या शुक्रवारी दिले जाणार आहे.
लसिकरण केंद्र कुठल्याही परिस्थितीत बंद राहणार नाही, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. परंतू त्यासाठी लसींची उपलब्धताही वेळेवर व्हायला हवी, असे डॉ. खतगावकर यांनी सांगितले. जिल्ह्यात १०२ ठिकाणी लसिकरण केंद्र सुरू असून आठवडाभर आधीच १ लाख ७५ हजार डोसेसची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी काल १२९०० डोसेस प्राप्त झाले. आता तेही संपल्यात जमा असून जालना जिल्ह्याला दररोज किमान ५० हजार डोसेसची गरज असल्याचे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- जालन्यात दुपारनंतर मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट, विनाकारण फिरणाऱ्यांची थेट कोवीड चाचणी
- शासनाने जाहीर केलेली मदत आठ दिवसात पोहोचवणार – हसन मुश्रीफ
- रेमडिसीवीर नंतर औरंगाबादेत आता ‘या’ इंजेक्शनचा तुटवडा
- मदतीचा हात ! पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दोन महिने मोफत धान्य मिळणार
- औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याची सीमा सिल

