🕒 1 min read
मुंबई: संभाजी राजे छत्रपती यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानात २६ फेब्रुवारी पासून आमरण उपोषणाला सुरवात केली होती. दरम्यान काल (२८ फेब्रुवारी) राज्यातील मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी त्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ज्या ज्या मागण्या मान्य झाल्या त्याचे वाचन त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्यासमोर केले. संभाजी छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्या काही मागण्या मान्य झाल्याने त्यांनी काल उपोषण मागे घेतले. मात्र यावरूनच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
मराठा समाजाच्या मागण्या देवेंद्र फडणवीस सरकारने तात्काळ मंजूर केल्या होत्या. मात्र ठाकरे सरकार त्याची अंमलबजावणी करण्यात कुचराई करत असल्याने छत्रपती संभाजीराजे यांना आंदोलन करावे लागले. राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र संभाजीराजे यांचा असा समज झाला असेल की आपला विजय झाला आहे; तर तो क्षणभंगुर आनंद आहे. असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
तसेच राजू शेट्टी यांचे आंदोलनही संभाजीराजेंच्या सारखेच असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. शेट्टी यांनी उपस्थित केलेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर भाजपाने आंदोलने केली असल्याचेही ते म्हणाले आहेत. दरम्यान छत्रपतींना आपले प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. आता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर मविआ सरकार समाजाची फसवणूक करणार नाही, अशी आशा आहे. अशी अपेक्षा व्यक्त करत चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवरही टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “नवाब मलिकांचा राजीनामा घ्या, अन्यथा…”, चंद्रकांत पाटलांचा इशारा
- IPL 2022: इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाची आयपीएल हंगामातून माघार, कारण…
- ‘या’ तारखेला उघडणार केदारनाथचे दरवाजे; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर जाहीर
- ‘वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा चित्रपटसारखी संजय राऊतांची अवस्था’ – आशिष शेलार
- ‘बाळासाहेबांनी मुंबई वाचवण्यासाठी काम केले, त्यांचे चिरंजीव मात्र…’; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
