Share

‘बाळासाहेबांनी मुंबई वाचवण्यासाठी काम केले, त्यांचे चिरंजीव मात्र…’; चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

Published On: 

कोल्हापूर: नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी ईडीने चौकशी केल्यानंतर अटक केली. नवाब यांना अटक केल्यानंतर मुख्यमंत्री आणि शरद पवार राजीनामा घेतील असं वाटलं होतं. दाऊद सारख्या व्यक्तीशी संबंध आल्यानंतर राजीनामा घेत नाही याचा अर्थ सरकार देखील त्यांना साथ देतंय असं दिसतं, असं चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांनी बॉम्बस्फोटानंतर मुंबई वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यांचे चिरंजिव सत्तेसाठी नवाब यांना साथ देत आहेत त्यामुळे हे सगळे विषय नागरिकांच्या समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवाब मलिक यांचा उद्धव ठाकरे जोपर्यंत राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत भाजपचे आंदोलन सुरू राहील, असंही पाटील म्हणाले.

भाजपवर टीका करणाऱ्यांवर बोलताना पाटील म्हणाले, ९३ च्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण मुंबई उडवण्याचा प्रयत्न होता. पण त्यात दाऊद यशस्वी झाला नाही. हसीना पारकरच्या संबधित जमीन नवाब मलिक घेतात, ही प्रॉपटी प्रामुख्याने दाऊद साठीच घेतली आहे. ईडीने कारवाई केल्यानंतर भाजपवर सगळे टीका का करतात हे कळत नाही. गुन्हा कधीच लपत नाही. आता काही पुरावे समोर आले आहेत. फडणवीस यांच्या काळात पुरावे समोर आले असते तर ही वेळ आली नसती, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!