नवी दिल्ली : इंग्लंडचा दिग्गज सलामीवीर फलंदाज जेसन रॉयने आयपीएल २०२२ च्या हंगामातून आपले नाव माघारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेसन रॉय हा २०२२ आयपीएल हंगामासाठी गुजरात टाइटंस संघाचा भाग होता. त्याने या हंगामात न खेळण्याचे कारणही सांगितले आहे. त्याला जास्त वेळ बायो बबल राहायचं नसल्यामुळे त्याने या हंगामातून माघार घेतली आहे.
जेसन रॉयला गुजरात टाइटंसने आयपीएल ऑक्शनमध्ये २ कोटीला खरेदी केल होत. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार या निर्णयाबद्दल त्याने फ्रेंचायझीला आपला निर्णय कळवला आहे. परंतु गुजरात टाइटंसने अजून कोणत्याही रिप्लेसमेंट खेळाडूच नाव जाहीर केल नाही.
ही त्याची आयपीएलमधून माघार घ्यायची दुसरी वेळ आहे. या अगोदर त्याने २०२० च्या हंगामातून व्यक्तीगत कारणामुळे माघार घेतली होती. त्यावेळी तो दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता.
जेसन रॉयने केले होते पाकिस्तान सुपर लीगमध्ये जबरदस्त प्रदर्शन
आत्ताच झालेल्या पाकिस्तान सुपर लीग मध्ये रॉयने जबरदस्त प्रदर्शन केले होते. तो या हंगामात केवळ सहा सामने खेळला. तरीही तो जास्त धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत समाविष्ट होता. क्वेटा ग्लाडीएटर्स कडून खेळताना रॉयने ५०.५०ची सरासरी व १७० च्या स्ट्राईक रेटने ३०३ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने दोन अर्धशतक झळकावली होती.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

