Share

विधानपरिषदेच्या जागेसाठी पुणे शहराला संधी मिळाली तर माझा जरूर विचार होईल

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यपाल नामनिर्देशित १२ जागात ‘ महाविकास आघाडी’तला घटक पक्ष कॉंग्रेस पक्षाकडून चार लोकांना विधान परिषदेवर पाठवले जाणार आहे.’या चार जागांमध्ये जर पुणे शहराला प्रतिनिधित्व मिळणार असेल तर माझा जरूर विचार होईल’, असा विश्वास कॉंग्रेस निष्टावंत गोपाळ तिवारी यांनी ‘महाराष्ट्र देशा’ सोबत बोलतांना व्यक्त केला.

मी गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी पुण्यात काम करतोय.भाजपाचा गड समजल्या जाणऱ्या ठिकाणावरून मी नगरसेवक म्हणून निवडून आलो.पुण्यातल्या कॉंग्रेस पक्षाच्या वाढीसाठी मी अनेक वर्षापासुन प्रयत्न करतोय. त्यामुळे जर पुण्याला प्रतिनिधित्व द्यायचा विचार असेल तर निश्चितच माझ्या नावाचा विचार व्हावा, असे तिवारींनी पुढे म्हटले आहे.पण शेवटी सर्वस्वी निर्णय पक्षाचा राहील आणि जो काही निर्णय येईल तो मला मान्य राहील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली

विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ जागांवर कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला चार जागा येणार आहेत.या चार जागांमध्ये कुणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.तरी मुजफ्फर हुसैन, रजनी पाटील, सचिन सावंत आणि अनिरुद्ध वनकर ही नावे कॉंग्रेसकडून निश्चित झाल्याचे बोलले जाते आहे.पण कॉंग्रेसकडून अजून कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!